दुबईमध्ये कोजागिरी पौर्णिमा दणक्यात साजरी - Onlne Patrakar Sangh




दुबईमध्ये कोजागिरी पौर्णिमा दणक्यात साजरी



MAHARASHTRA, Pune City 2022-10-17 06:11:52


*🚩 संस्कृती मराठी मंडळ दुबई 🚩* परदेशात राहून महाराष्ट्रातील परंपरा आणि संस्कृती जपणारे मंडळ. संस्कृती मराठी मंडळ तर्फे दुबईमध्ये झबील पार्क ( दुबई फ्रेम ) येथे ९ ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या निमीत्ताने कोजागिरी पौर्णिमा, दसरा मेळावा आणि खास महिलांसाठी भोंडल्याचे आयोजन करण्यात आले मंडळांचे प्रमुख पदाधिकारी १) अमित मोरे २) अमित कुडाळकर ३) साक्षी मोरे ४) मनोज बागल ५) मंदार कुलकर्णी ६) नितिन आंबरे आणि त्यांनी नेमलेले कार्यकारी मंडळ १) माधुरी पाटील २) रूपाली मुरूडकर ३) रूपाली पवार ४) अर्चना यादव ५) अनु कच्छाव ६) स्नेहल जाधव ७) दत्ता घनगावकर ८) वैभव नलावडे ९) मनोज रेवडे यांनी अतीशय सुरेख नियोजन केले. सुरवातीला श्री गणेशाची पूजा झाल्यावर आरती करून कार्यक्रमाला सुरूवात झाली. यामध्ये, सर्व महिलांनी भोंडल्याची गाणी म्हणत फेर धरला. प्रत्येक महिलेने स्वतः हाताने बनवलेली खिरापत आणली होती. त्यानंतर दांडियाच्या गाण्यावर अतिशय सुरेख डान्स करत खेळीमेळीचे वातावरण निर्माण केले. महिलांसाठी तळ्यात मळ्यात, उखाणे घेणे असे वेगवेगळे खेळ घेतले गेले. काही सभासदांनी दसऱ्याचे माहिती, कोजागिरी पौर्णिमेची माहिती आणि भोंडल्याची माहिती दिली. कार्यक्रमाला जवळपास शंभर सवाशे लोकांनी हजेरी लावली त्यात महिलांचा विशेष सहभाग होता. मंडळातील सभासदांनी एकमेकांना आपट्याचे पान देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. मंडळातील काही सभासदांचे वाढदिवस साजरे झाल्यावर मसाले भात, समोसा, शिरा वगैरे जेवणाची सोय केली होती. चंद्राचे प्रतिबिंब दुधात दिसल्यावर चंद्राची पूजा आणि औक्षण करून सर्वांना चविष्ट मसाले दूध देण्यात आले. मंडळातील सर्व सभासदांचे धन्यवाद आणि शुभेच्छा.



×


Online Patrakar Sangh
  • Translate: